उदगीर: उदगीर नगरपालिका निवडणुकीत क्रांतिकारी विजय होईल,आमदार अमित देशमुख
Udgir, Latur | Nov 29, 2025 उदगीर नगरपालिका निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून,निवडणुकीच्या प्रचार सभेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत, भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा घेतल्यानंतर काँग्रेस पक्षाने आमदार अमित देशमुख व खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांची सभा २८ नोव्हेंबर रोजी रात्री नगरपालिकेच्या प्रांगणात घेण्यात आली,उदगीरची भूमी ही क्रांतिकारी भूमी असून नगरपालिका निवडणुकीत क्रांतिकारक विजय होईल,उदगीरच्या मतदाराला विकत घेणारा जन्माला आला नाही.