ठाणे: घोडबंदर येथील स्वामी समर्थ मठावर अतिक्रमण विभागाची कारवाई, स्वामी भक्त आक्रमक, आयुक्तांच्या दालनासमोर आंदोलन
Thane, Thane | Nov 10, 2025 घोडबंदर रोडवरील आनंदनगर येथे श्री स्वामी समर्थ मठ आहे. या मठावर काल ठाणे मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली होती. मात्र स्वामी भक्तांनी विरोध केल्यानंतर तात्पुरती कारवाई थांबवली. मात्र ही कारवाई होणार असल्यामुळे स्वामीभक्त आक्रमक झाले असून आज आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करून आपली संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी आमदार, मंत्री जबाबदार असतील असा इशारा मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिला.