वेगवेगळ्या मोबाईल नंबर वरून फोन तसेच व्हाट्सअप द्वारे व्हिडीओ कॉल करून मुंबई सायबर सेल मधून बोलत असल्याचे सांगून ८ लाख ८० हजारांची फसवणूक करणारे तिघे सायबर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय रंगनाथ चेमटे (रा-भाळवणी ता. पारनेर जि. अहिल्यानगर), अभिजित अजिनाथ गिते (रा-टादेगांव ता. आष्टी जि. बिड), अक्षय संजय तांबे (रा-सलाबतपूर ता. नेवासा, जि. अहिल्यानगर हल्ली रा-द्वारका पॅलेस लक्ष्मी चौक दत्त कॉलनी हिजवडी, पुणे) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.