शेवगाव नगरपालिका निवडणुकीत राजकीय भुकंप झाला आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या पत्नीला शिवसेनेच्या शिंदे गटाने अचानक एबी फॉर्म दिला. त्यामुळे शिंदे गटाच्या महिला पदाधिकारी विद्या गाडेकर यांनी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.