हवेली: वाघोलीमध्ये राजस्थानी तस्कराला अटक; लाखोंचा मॅफेड्रॉन जप्त
Haveli, Pune | Nov 30, 2025 स्वतः अंमली पदार्थाच्या व्यसनात अडकलेल्या राजस्थानी तस्काराला पकडून अंमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्याकडून ११ लाख १० हजार रुपयांचे ५१ ग्रॅम ५० मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम डी) जप्त केले आहे.लेखाराम धर्मराज चौधरी (वय २७, रा. केसनंद-वाघोली रोड, चिरायु हॉस्पिटलचे बिल्डिंग मागे, वाघोली) असे या तस्कराचे नाव आहे.