बार्शी: कॉलेजला गेलेली अल्पवीन मुलगी बेपत्ता; तालुका पोलिसांकडून शोध सुरू
Barshi, Solapur | Sep 17, 2025 बार्शी शहरातील एक १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. १३ सप्टेंबर रोजी सकाळी कॉलेजला जाते असे सांगून घरातून गेलेली ही मुलगी दुपारी १ वाजले तरी घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली आहे. अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेल्याचा संशय तिच्या वडिलांनी व्यक्त केला असून, बार्शी तालुका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.