अमरावती: स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 'अवांतर वाचन' महत्त्वाचे: दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन
*स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी 'अवांतर वाचन' महत्त्वाचे:* *दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन* अमरावती, दि. 10 (जिमाका): स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासक्रमाच्या पुस्तकांपुरते मर्यादित न राहता अवांतर वाचन देखील करावे, कारण ते यश मिळवण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते, असे मत विभागीय आयुक्त कार्यालयतील अप्पर आयुक्त सूरज वाघमारे यांनी व्यक्त केले. शासकीय विभागीय ग्रंथालय, अमरावती येथे दिवाळी अंक प्रदर्शन 2025 चे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.