राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात जनता संवाद उपक्रमाचे आयोजन
आज मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पार पडलेल्या 'जनता संवाद' या उपक्रमाद्वारे महाराष्ट्र राज्याचे उद्योग, सार्वजनिक बांधकाम, उच्च आणि तंत्रशिक्षण, आदिवासी विकास आणि पर्यटन, मृद व जलसंधारण विभागाचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सर्वसामान्य नागरिक, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.यावेळी उपस्थितांचे प्रश्न, त्यांच्या मागण्या तसेच समस्या ऐकून घेतल्या.