पालघर: पेल्हार परिसरात भरधाव ट्रक आणि रिक्षाचा भीषण अपघात, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात घटना कैद
मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पेल्हार परिसरात भीषण असा अपघात घडला आहे. भरधाव वेगातील एका ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर सीसीटीव्ही फुटेज समाज माध्यमांवर देखील वायरल झाले आहे.