सेलू: सुरगाव शिवारात सुरनदीतून विनापरवाना वाळू नेणारा ट्रॅक्टर जप्त; तहसीलदारांचा पहाटेचा छापा, वाळू माफियांत भरली धडकी
Seloo, Wardha | Nov 22, 2025 सुरनदीतून विनापरवाना अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर तहसील प्रशासनाने कारवाई करत वाहन जप्त केले. ही कारवाई शनिवारी ता. २२ ला पहाटे साडेचारच्या सुमारास तहसीलदार डॉ. शकुंतला पराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरगाव शिवारात करण्यात आली. शहरातील खाली भूखंडावर साठवणूक करून ठेवलेल्या वाळू ठिय्यावर कारवाई होणे गरजेचे आहे.