आंबेटाकळी येथून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. आंबेटाकळी येथील लक्ष्मी महेश सरदार वय ३० वर्ष ही विवाहिता घरून निघून गेली ती उशिरापर्यंत घरी परत न आल्याने तिचा नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला असता ती कुठेच मिळून आली नाही.यामुळे नातेवाईकांनी हिवरखेड पोलीस स्टेशनला तक्रार दिली तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे.