अहमदपूर: गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात; तांबटसांगवी रस्त्यावर प्रवाशांचा जीव धोक्यात!
Ahmadpur, Latur | Nov 27, 2025 गुत्तेदाराच्या हलगर्जीपणामुळे भीषण अपघात; तांबटसांगवी रस्त्यावर प्रवाशांचा जीव धोक्यात! अहमदपूर-तांबटसांगवी सिमेंट काँक्रीट रस्त्यावर गुत्तेदाराच्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे तांबटसांगवी येथील शेतकरी नामदेव कदम यांचा भीषण अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत. इतकेच नव्हे तर, त्याच ठिकाणी थोड्याच वेळात ऊसतोड कामगारांच्या दुचाकीलाही अपघात होऊन दोघे जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.