संगमनेर: नितीन गडकरी कामाचा माणूस !काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातंकडून गडकरींचे कौतुक तर सरकारवर निशाणा
नितीन गडकरी कामाचा माणूस !काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातंकडून गडकरींचे कौतुक तर सरकारवर निशाणा* केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी '१५ लाख कोटी'ंचा निधी पडून असल्याबद्दल व्यक्त केलेल्या खदखदीवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केंद्र आणि राज्य सरकारला धारेवर धरले आहे. नितीन गडकरी 'कामाचा माणूस' आहेत, त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे सांगत, थोरात यांनी एकप्रकारे सरकारच्या आर्थिक नियोजनावरच थेट हल्लाबोल केलाय.'