तुमसर: बामणी ते शिवनी रस्त्यावर विनापरवाना रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर तुमसर पोलिसांच्या ताब्यात
तुमसर तालुक्यातील बामणी ते शिवनी रस्त्यावर दि. 11 नोव्हेंबर रोज मंगळवारला दुपारी 4 वा. च्या सुमारास तुमसर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाशकुमार साखरे हे आपल्या पोलीस पथकासह पेट्रोलिंग करताना त्यांना ट्रॅक्टर क्र.MH 36 Z 7204 यात विनापरवाना रेती वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी सदर ट्रॅक्टर व त्यातील एक ब्रास रेती असा एकूण 7 लाख 6 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रॅक्टर चालक शुभम कहालकर याच्याविरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.