कोरेगाव: रहिमतपूरच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार; उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची घोषणा
ऐतिहासिक वारसा लाभलेल्या रहिमतपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. यापूर्वी शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला आहे आणि भविष्यातही रहिमतपूरच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी मी, राज्याचा अर्थमंत्री म्हणून उपलब्ध करून देईन, असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिला. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास रहिमतपूर येथील गांधी चौकात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य प्रवेश सोहळ्यात ते बोलत होते.