काटोल: चांडक लेआउट येथे किरायाच्या खोलीतून गांजाची तस्करी,; सहा आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल लाखोंचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | Nov 25, 2025 काटोल हद्दीत अमली पदार्थ विरोधी कार्यवाही पथक पेट्रोलिंग करीत असताना त्यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चांडक लेआउट येथे रमेश कसबे यांच्या घरी किरायाने राहणारा आरोपी समीर राऊत यांच्या घरी छापा मार कार्यवाही केली असता तेथे गांजा आढळून आला. याप्रकरणी आरोपी समीर राऊत, वैभव काळे, छगन चरपे, सचिन झोड सुरज सुपटकर, विशाल शेंभेकर यांच्याविरुद्ध काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.