परळी: तालुक्यातील हेळंब येथे घरफोडी झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
Parli, Beed | Nov 30, 2025 परळी तालुक्यातील हेळंब येथे घरफोडी झाल्याची घटना घडली आहे फिर्यादीच्या पत्नीचे घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्याने कपाट उघडुन चोरुन घेऊन गेले यामध्ये ३०००० - सोन्याचे ०६ ग्रॅम वजनाचे दोन झुंबर २०००० चे एक काळ्या मन्यामधील ओवलेली पोत ज्या मध्ये सोन्याचे दोन डोरले व ५० सोन्याचे मनी जुने वापरते असा एकुण किंमत ५०००० किमतीचा ऐवज चोरट्याने चोरी केला म्हणून याप्रकरणी राजेभाऊ भानुदास पाळवदे यांच्या फिर्यादीनुसार परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.