लातूर: परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांकरिता MH24- CE ही नवीन मालिका सुरु होणार-उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
Latur, Latur | Nov 29, 2025 लातूर- परिवहनेत्तर संवर्गातील वाहनांसाठी MH24- CE ही नविन मालिका सुरु होणार आहे. या अंतर्गत आकर्षक वाहन क्रमांक मिळविण्यासाठी 01 डिसेंबर 2025 रोजी मोटार कार तथा मालवाहू वाहन (दुचाकी वगळून), तसेच 02 डिसेंबर 2025 रोजी दुचाकी वाहनांसाठी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 पर्यत अर्ज व विहीत शुल्काचा राष्ट्रीयकृत बँकेचा धनादेश (डीडी) स्विकारण्यात येणार आहेत.