वाकड–हिंजवडी उड्डाणपुलावर काल रात्री कार, बस आणि ऑटो रिक्षामध्ये विचित्र अपघात झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार आणि ऑटोमधील दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. या अपघाताची हिंजवडी पोलीस ठाण्यात अद्याप नोंद झालेली नाही, मात्र लवकरच गुन्हा नोंद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.