देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त आज अर्जुनी मोरगाव पंचायत समिती कार्यालयात बालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. देशभरात साजरा होणाऱ्या या विशेष दिनाचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समितीचे माजी उपसभापती होमराज पुस्तोडे यांच्या हस्ते करण्यात आले.