अहिल्यानगर जिल्ह्यात आज आठ नगरपरिषदांच्या निवडणुका होत आहे. मात्र, राहाता नगरपरिषदेत मतदानाच्या पूर्व संध्येला राडा झाल्याचे समजते. भाजप उमेदवार वगळता सर्व विरोधी पक्षांच्या उमेदवारांनी एकत्र येत राहाता नगरपरिषद कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाब विचारत ठिय्या आंदोलन केले. ईव्हीएम मशीन बदल, पारदर्शकता नसल्याचा आरोप तसेच बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट बदलताना प्रक्रिया न पाळल्याचा निषेध उमेदवारांनी केला आहे. मात्र, आज मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडत असल्याची माहिती समजते.