खामगाव: रेल्वेगेट येथून अल्पवयीन मुलीस फुस लावून पळविले
अज्ञाताविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
१६ वर्षीय मुलीला अज्ञाताने फूस लावून पळून नेल्याची घटना रेल्वेगेट येथे ८ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञाताने फूस लाऊन पळून नेले असा संशय पोलीस तक्रारीत व्यक्त करण्यात आला असून यावरुन शहर पोलिसांनी तक्रारीवरून अज्ञातावर कलम १३७ (२) भारतीय न्याय संहितानुसार गुन्हा दाखल केला आहे.