आज दि.1डिसेंबर 2025 वार सोमवार रोजी सायंकाळी 5वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन ता. पिंपरी येथे अल्पभूधारक शेतकरी नामे दादाराव अंभोरे यांच्या गट क्रमांक 23 मध्ये खरिपात पेरलेली मकाची कणसेची गंजीला अज्ञात व्यक्तीने आज दि.1डिसेंबर 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आग लावून जाळून टाकले,यामध्ये लाखो रुपयाची मका त्यांची जळून खाक झाली असून याप्रकरणी हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात शेतकरी दादाराव अंभोरे यांनी तक्रार दिली असून या व्यक्तीचा शोध सध्या पोलीस घेत आहे.