कल्याण: डोंबिवलीत राबवलेल्या फ्रेंडशिप रन 2025 मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
Kalyan, Thane | Nov 9, 2025 डोंबिवली मध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने फ्रेंडशिप रन २०२५ चे आयोजन केले होते. या फ्रेंडशिप रन मध्ये डोंबिवलीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे त्याचे महत्त्व जाणणे आणि व्यसनापासून दूर राहणे याबाबत जनजागृती करत ही फ्रेंडशिप रन चे आयोजन केले होते .नागरिकांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली.