राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज शिर्डीत येत मनोभावे साईबाबांचे दर्शन घेतले.एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी त्या आज अहिल्यानगर येथे आल्या होत्या. शिर्डीत आल्यावर नेहमीच साईबाबांच्या दर्शनाला येत असते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.यानंतर त्यांनी विविध मुद्द्यावर माध्यमांशी संवाद साधला.