शेगाव: दिल्ली येथील झालेल्या स्फोटानंतर शेगाव येथील संत श्री गजानन महाराज मंदिर परिसरात भाविकांची चौकशी
दिल्ली येथील झालेल्या स्फोटानंतर आज दिनांक ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजे पासूनच शेगाव येथील गजानन महाराज मंदिर परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक भाविकांची कसून चौकशी व तपासणी पोलिसांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर असे की,दिल्ली येथील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट झाला असून त्यामुळे दिल्ली हादरली आहे. त्यामध्ये आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील या स्फोटानंतर संपूर्ण दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले.