जळगाव: सोनी नगरात चोरट्यांचा धुमाकूळ; दोन ठिकाणी चोरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद, रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील पिंप्राळा शिवारातील सोनी नगर भागात चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत एकाच रात्री दोन बंद घरे फोडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दोन्ही घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. ही घटना गुरूवारी ४ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता घडली आहे. या घटनेत चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.