कल्याण: कल्याण मध्ये बोगस रिक्षाचा पर्दाफाश
Kalyan, Thane | Nov 7, 2025 कल्याण मध्ये बोगस रिक्षेचा पर्दाफाश झाला आहे. विसरलेल्या दागिन्यांच्या बॅगेचा शोध घेताना क्राईम ब्रांचची शक्कल फळास आली आहे. साडेतीन लाखांचे दागिने महिलेला परत करण्यात आले आहेत. तर बोगस रिक्षा चालवणारा चालक जयेश गौतम अटकेत आहे. ही घटना काल रात्री उशिरा घडली. त्यानंतर आज दिनांक 7 नोव्हेंबर रोजी रात्री 12च्या सुमारास पोलिसांनी माहिती दिली आहे.