खामगाव: खामगांव शेकोट्या वाढल्या
थंडीचे जोरदार आगमन झाले असून पारा घसरू लागल्याने थंडी वाढली
दिवसाच्या तापमानात घट
पावसाने विश्रांती घेतली असून थंडीचे जोरदार आगमन झाले असून पारा घसरू लागल्याने थंडी वाढली आहे. दिवसाच्या तापमानात घट झाली असून खामगाव शहराचे तापमान ३ ते ४ अंशांनी घटले असून आगामी काही दिवसांत थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा जोर जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात सौम्य तर कोकणात थंडी कमी आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे.