शिरपूर: शहरातील मोहंदीय्या हॉल जवळ एमआयएमचे इम्तियाज जलील यांची भव्य जाहीर सभा
Shirpur, Dhule | Nov 24, 2025 शिरपूर-वरवाडे नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएम पक्षाचे माजी खासदार व प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या भव्य जाहीर सभेचे 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास शहरातील मोहमद्दीय्या हॉल परिसरात आयोजन करण्यात आले. उपस्थित नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात जलील यांनी पक्षाची भूमिका, निवडणुकीतील धोरणे याबाबत मार्गदर्शन केले.