ठाणे: निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजपा उत्तर देते, मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे
Thane, Thane | Nov 10, 2025 आज दिनांक 10 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर पुन्हा एक्सद्वारे गंभीर आरोप केले आहेत. यावेळी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. राजाचा जीव पोपटात तसा भाजपचा जीव EVM आणि मतदार यादीत. बिहार आणि बाकी सगळ्या निवडणुका या पद्धतीनेच जिंकायच्या आहेत. अन् म्हणूनच निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की भाजपा उत्तर देते अस ते म्हणाले.