नाशिक: कामगार कायद्यांविरोधात सीटूची निदर्शने
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी; नवीन चार संहिता रद्द करण्याची मागणी
Nashik, Nashik | Nov 26, 2025 केंद्र सरकारने आणलेल्या नवीन चार कामगार संहितांच्या विरोधात भारतीय ट्रेड युनियन केंद्र (सीटू) यांच्या वतीने बुधवार, दि. २६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. कामगार हिताला मारक असलेल्या या संहितांचा तत्काळ रद्दबातल करण्याची मागणी करत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. दुपारी ४ वाजता झालेल्या या आंदोलनात कामगारांनी “कामगार विरोधी कायदे रद्द करा”, “कॉर्पोरेट धार्जिण्या धोरणांना विरोध” अशा घोषणा दिल्या नवीन कायदे कामगारांनास विरोधात असल्याचे आरोप केल