जळगाव जामोद: सर्पमित्र शरद जाधव, अभिजीत तायडे यांनी शहरातील गोविंदपुर येथे कोब्रा जातीच्या सापाला केले रेस्क्यू
जळगाव जामोद शहरातील गोविंदपुर येथे सर्पमित्र शरद जाधव व अभिजीत तायडे यांनी कोब्रा जातीच्या पाच फूट लांब सापाला रेस्क्यू केले. शहरातील सौरभ तायडे यांच्या घरात भला मोठा साप निघाला त्यामुळे त्यांचा परिवार व ते घाबरून गेले त्यांनी लगेच सर्पमित्र शरद जाधव व अभि तायडे यांना बोलावले सर्प मित्रांनी मोठ्या शीताफिने त्याला कैद केले व जंगल अधिवासात सोडून दिले.