अमरावती: बडनेरा येथे रिसेप्शनमध्ये नवरदेवावर चाकू हल्ला, अज्ञात हल्लेखोर पसार
अमरावतीच्या बडनेरा येथे आयोजित नवविवाहितांच्या रिसेप्शन कार्यक्रमात नवरदेवावर दोन अज्ञात व्यक्तींनी चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना रात्री घडली. हल्ल्यानंतर दोन्ही आरोपी स्टेजच्या मागील बाजूने पळून गेले असून, संपूर्ण प्रकार रिसेप्शनमध्ये लावलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे. माताफैल परिसरातील सुजलराम चरण समुद्रे याचा विवाह सोमवारी अचलपूर येथे पार पडला होता. बडनेरा रोडवरील साहिल लॉन येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास जेवणाचा कार्यक्रम