सातारा: साताऱ्यात 25 वा जिल्हा ग्रंथ महोत्सव सुरू; जिल्हाधिकाऱ्यांचे ‘एक पुस्तक खरेदीचे’ आवाहन
Satara, Satara | Nov 7, 2025 सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीच्या वतीने आजपासून 25 वा ग्रंथ महोत्सव सुरू झाला आहे. या ग्रंथ महोत्सवामुळे सातारा शहर ‘ग्रंथप्रेमींचे शहर’ म्हणून ओळखले जात असल्याचे गौरवोद्गार जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी काढले.आज शुक्रवार, दिनांक 7 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता झालेल्या उद्घाटन सोहळ्यात जिल्हाधिकारी पाटील यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, “मोठ्या प्रमाणात भरविण्यात येणारा हा ग्रंथ महोत्सव इतर जिल्ह्यांसाठी दिशादर्शक ठरेल.असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.