आज ५ डिसेंबर शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता नवी दिल्लीतील संसद भवन परिसरात महाविकास आघाडीच्या (MVA) खासदारांनी शेतीशी संबंधित अतिवृष्टीच्या गंभीर संकटावर केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन केले. संसद भवनाच्या मकर द्वारासमोर खासदारांनी एकत्र येत घोषणा देत सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध नोंदविला. अतिवृष्टीमुळे राज्यातील लाखो शेतकरी संकटात महाराष्ट्रात सततची पावसाची लाट, पिकांचे मोठ्या प्रमाणात झालेलं नुकसान आणि केंद्र सरकारकडून अद्याप मदत जाहीर न झाल्याच्या पार्श्वभूमीवर खासदारां