नागपूर शहर: वेळाहरी येथे एका ट्रकला दुसऱ्या ट्रकची मागून धडक, राजस्थान येथील ट्रक चालकाच्या जागीच मृत्यू
15 सप्टेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास आरिफ सुब्बी खान 38 वर्ष राहणार राजस्थान हे त्यांच्या ट्रकने आय टी एस कंपनी करिअरचे सामान घेऊन बिलासपूर येथून बेंगलोर येथे जात असताना पोलीस ठाणे बेलतरोडी हद्दीतील आउटर रिंग रोड वेळा हरी येथे त्याने दुसऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की आरिफ यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मुबारिक खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बेलतरोडी येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.