भंडारा: तडीपार २ आरोपी गजाआड; सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थांचे सेवन करताना आढळले! आंबेडकर वार्ड गणेशपुर येथील घटना
भंडारा शहरातील आंबेडकर वार्ड गणेशपुर येथे ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ३ वाजताच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे (स्था.गु.शा.) पोहवा गाढवे स्टाफ पेट्रॉलींग करत असताना, सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्ती वनस्पतीचे पानाची बिडी (गांजासदृश अंमली पदार्थ) सेवन करताना आढळून आले. आरोपी तेजस सुनिल घोडीचोर (वय २०) आणि मोहीत विष्णु मडामे (वय २०) (दोघेही रा. आंबेडकर वार्ड, गणेशपुर) यांची एन.डी.पी.एस. अॅक्टमधील तरतुदींचे पालन करून पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता, त्यांच्या ताब्यातून दोन वनस्पतीचे पानाची....