दिग्रस: तालुक्यातील कांदळी परीसरात ढगफुटीसदृश्य पावसाचा धुमाकूळ, नदी नाल्यांना पूर, शेत पिके खरडली
दिग्रस तालुक्यातील कांदळीसह परीसरात आज दि. १७ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान ढगफुटीसदृश्य पावसाने चांगलेच झोडपून काढले, या पावसामुळे अनेक घरात पुराचे पाणी शिरले नदी नाल्यांना पुर आला व शेतातील कापूस तूर सोयाबीन पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून शेतजमीन खरडून गेल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतातील कापूस तुर सोयाबीन ज्वारी पिके वादळी वाऱ्यामुळे आडवी झाली संतरा पिकांना फटका बसला व शेतजमीन खरडून गेल्या. या ढगफुटीसदृश्य पावसामुळे कांदळी गावालगत नाल्याला पुर आला.