कन्नड नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या विराट जनसभेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता कवडे तसेच सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कन्नड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगत, माझी लाडकी बहिण संजना जाधव आमदार आहे आणि आता अनिता कवडे यांच्या रूपाने आणखी एक लाडकी बहिण जनतेच्या सेवेत दाखल होत असल्याचे वक्तव्य शिंदेंनी केले