राहुरी: चोरीच्या वाहनांचा शोध,राहुरी पोलिसांची विशेष मोहीम, ४७ विना नंबर प्लेट दुचाकींवर दंडात्मक कारवाई
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत काही वाहनचोरांकडून दुचाकी चोरी करून अल्प दरात विक्री केल्या जात असल्याची माहिती पोलीस ठाण्यास मिळाली होती. सदर वाहनांचा वापर बहुधा विना नंबर प्लेट केला जात असल्याने, आज बुधवार दिनांक ३ डिसेंबर रोजी राहुरी पोलिसांकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान 47 दुचाकी वाहने विना नंबर प्लेट आढळून आली. संबंधित वाहनांवर एकूण ₹29,000/- दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.