तहसील पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी 17 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन थंडर अंतर्गत मध्यरात्री एमडी ची विक्री करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अंगझडती दरम्यान आरोपीकडून एमडी देखील जप्त करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख यांनी दिली आहे.