मुळशी: हिंजवडीत पुन्हा एकदा अपघाताची घटना, तरुणीचा मृत्यू
Mulshi, Pune | Nov 21, 2025 पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरात पुन्हा अपघाताची घटना घडली आहे. मारुंजीतील शिंदेवस्ती येथे शुक्रवारी (दि. २१) दुपारी कासारसाई धरणावरून घरी परतणाऱ्या तरुण-तरुणीच्या दुचाकीला भरधाव मिक्सरने दिलेल्या धडकेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर तरुण गंभीर जखमी झाला आहे.