वर्धा: जनतेचे प्रश्न सोडवण्यासोबतच 24 तास जनतेच्या सेवेत उपलब्ध राहील : रविकांत बालपांडे
Wardha, Wardha | Dec 1, 2025 “जनतेचे प्रश्न सोडवणे हीच माझी प्राथमिकता आहे. त्यासाठी मी 24 तास जनतेच्या सेवेत उपलब्ध राहीन,” असे विधान करत रविकांत बालपांडे यांनी लोकसेवेचा दृढ संकल्प व्यक्त केला. शहरातील विविध स्तरांवर नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून पारदर्शी आणि जवाबदार कार्यपद्धती राबवण्याची तयारी असल्याचे त्यांनी नमूद केले. लोकप्रतिनिधी हा जनतेसाठी सदैव उपलब्ध असला पाहिजे, या तत्त्वावर काम करत जनतेचा विश्वास संपादित करण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली.