आज दिनांक 4 डिसेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील अंधार वाडी येथे बिबट्याने बोकड्यावर हल्ला करीत ठार केले मात्र बोकड्याच्या थोड्या अंतरावर बसलेल्या चिमुकलीने पळ काढल्यामुळे बाल बाल बचावली मात्र बिबट्याचे ठिकाण बदलून दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र वन विभागाचे अधिकारी सदरील बाबीकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी असल्याचे चित्र दिसत आहे