कोपरगाव शहराजवळील नगर-मनमाड महामार्गावर हॉटेल पेशवा समोर तेलाने भरलेला टँकर व डंपर यांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याची घटना २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अंदाजे ४ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र टँकर आणि डंपर दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.