अमरावती: अमरावतीत इस्लामिक इन्फॉर्मेशन सेंटरचे फलक लागल्याने वाद,खासदार डॉ.अनिल बोंडे आक्रमक
“I Love Mohammad” मोहिमेनंतर आता अमरावती शहरात IIC (Islamic Information Center Maharashtra) या नावाने फलक लावण्यात आले असून, त्यावर “विचारा इस्लामविषयी?” असा मजकूर देण्यात आला आहे. या फलकांवर मोठ्या अक्षरात टोल-फ्री क्रमांकही दिलेला असून, फलक पंचवटी चौक तसेच शहरातील कॉलेज परिसरात लावण्यात आले आहेत.या फलकांमुळे शहरात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणावर भाजपचे राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे.