अमरावती: अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई
गायींची तस्करी करणारा टोळी पोलिसांच्या जाळ्यात
अमरावती ग्रामीण पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत गोवंश कत्तलीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाई मध्ये पोलिसांनी 36 गाईंची तस्करी करीत तीन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. गुन्हे शाखेचे अधिकारी किरण वानखेडे आणि लोणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विशाल रोकडे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सदरची कारवाई केली आहे.