अंढेरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रामनगर फाट्याजवळ १ डिंसेबरच्या रात्री साडेनऊ च्या सुमारास मोटारसायकल आणि चारचाकी ब्रिझा यांच्यात झालेल्या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला. याबाबत सविस्तर वृत्त असे की, रामनगर येथील सुखदेव सखाराम लेंडे शिक्षक यांनी अंढेरा पोलिस स्टेशन ला दिलेल्या फिर्यादीत त्यांचा मेहुणा अंकुश बाळकृष्ण भंनगे वय ३८वर्षे हा बाक्सर कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम.एच.२८जे८३६९ हा रामनगर येथे येत असताना रामनगर फाट्याजवळ रस्ता क्रॉस करीत असताना देऊळगाव राजा कडुन चिखलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर अपघात झाला.