नाशिक: नात्यांतील संवेदनशीलता मांडणारे एक्सपायरी डेट
Nashik, Nashik | Nov 26, 2025 राज्य नाट्य स्पर्धेत सुरंजन बहुउद्देशीय संस्थेच्या ‘एक्सपायरी डेट’ या दोन अंकी नाटकाचा प्रभावी व रोचक प्रयोग सादर झाला. आधुनिक काळापेक्षा दहा वर्षे पुढील भविष्यातील सामाजिक वास्तवाचा वेध घेत हे नाटक मानवी नात्यांतील अंतर, वृद्धांची उपेक्षा आणि वेगवान जीवनशैलीतील विसंगती यांना भिडणारे ठरले. या कथानकाचा केंद्रबिंदू आहेत नाना कुटुंबातील ज्येष्ठ. परदेशात अमेरिकेत राहणारी त्यांची मुलगी विजया वडिलांनी स्वतःच्या मृत्यूची तारीख निश्चित करावी, म्हणजेच आयुष्याची ‘एक्सपायरी डेट’ जाहीर करावी.